LIVE BLOG : वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच मराठा आरक्षण लागू

Advertisement

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2019 09:47 PM
मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा, पनवेलच्या दिशेने ट्रेन 20 ते 25 मिनिटं उशिराने, कुर्ल्यासह विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
Continues below advertisement
विश्वचषक 2019, इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्ने धुव्वा, इंग्लंड 27 वर्षांनंतर फायनलमध्ये, रविवारी लॉर्ड्सवर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात फायनल

पार्श्वभूमी

१. कर्नाटकानंतर गोव्यातही राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे 10 बंडखोर आमदार भाजप नेत्यांची भेट घेणार, तर मुंबईत कानडी आमदारांचा हायव्होल्टेज ड्रामा

२.  गेल्या आषाढीला धमकीवजा इशारा देणारा मराठा समाज यंदा मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार, फडणवीसांना आधुनिक शाहूंची उपमा, धनगर समाजाकडूनही जंगी स्वागताची तयारी

३. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्ग काहीकाळ ठप्प, वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीतही वाढ

4. कणकवलीतील चिखलफेक बाळासाहेबांना आवडली असती, जामीनावर सुटल्यानतंर नितेश राणेंची प्रतिक्रिया, चंद्रकांत पाटलांविरोधात बोलणं टाळलं

5.  आषाढी एकादशीसाठी पंढरीत जोरदार तयारी, दर्शनासाठी 7 किमीपर्यंत रांगा, तुकोबा आणि माऊलीच्या पालखीच्या रिंगणांचा डोळे दिपवणारा सोहळा

6. टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न अखेर अधुरं, मॅन्चेस्टरमध्ये न्यूझीलंडची टीम इंडियावर 18 धावांनी मात, जाडेजा-धोनीची झुंजार खेळी व्यर्थ

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.