LIVE BLOG : पावसाचा जोर असल्याने रविवारच्या काही एक्सप्रेस रद्द
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
27 Jul 2019 08:46 PM
मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे दिनांक 28.07.19 ला काही एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.
गाडी क्रमांक 12118 अप आणि 12117 डाऊन मनमाड लोकमान्य टिळक टर्मिलन्स गोदावरी एक्सप्रेस दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात केलीली आहेत.
गाडी क्रमांक 22102 अप आणि 22101 मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहे .
गाडी क्रमांक 51153 डाऊन मुंबई भुसावळ पैसेजर गाडी दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहे

#MahalaxmiExpress वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून रेस्क्यू केलेल्या प्रवाशांची बदलापूर स्थानकात व्यवस्था, सह्याद्री मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था
भिवंडी : वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली, 42 गावांचा संपर्क तुटला, गेरसे, कोसला, काकारपाडा, पलसोली, शेरे, अंबरजे, उशीद, हाल, फळेगाव, दहागाव, खातीवली, वासिंद, भातसई गावांचा संपर्क तुटला, रेल्वेच्या बोगद्यातील पावसाचे पाणी ओसरण्यासाठी किमान 4 ते 5 तास लागणार असल्याचे बोलले जात आहे.
कांबा गावच्या राहिवाश्यांच्या आणि पर्यटकांच्या मदतीसाठी आता भारतीय लष्कर आले आहे, वायुदलाचे हेलिकॉप्टर, आर्मीच्या 3 टीम आणि नेव्हीची टीम देखील दाखल झाली आहे ,
आर्मीच्या एकूण 3 टीम 3 बोटी सह आल्या आहेत,
नेव्हीची डायव्हर्सची टीम 2 बोटीसह अली आहे,
कांबा गावात काही गावकरी आणि रिसॉर्टमध्ये काही पर्यटक अडकले आहेत,
आर्मीच्या एकूण 3 टीम 3 बोटी सह आल्या आहेत,
नेव्हीची डायव्हर्सची टीम 2 बोटीसह अली आहे,
कांबा गावात काही गावकरी आणि रिसॉर्टमध्ये काही पर्यटक अडकले आहेत,
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे वांगणी येथे दाखल
भिवंडीत पाणीच पाणी, हजारो घरात शिरले पाणी, इदगाह, दर्गारोड ,भुसारमोहल्ला, कल्याणनाका ,गोपालनगर ,
पदमानगर, बंदर मोहल्ला, नदी नाका ,खाडीपार ,अंजुरफाटा यांसह तालुक्यातील असंख्य भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, नदी काठी असलेल्या झोपडपट्टीतील सुमारे 1500 घरांमध्ये कामवारी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे 40 ते 50 हजार नागरीकांचे जनजीवन विस्कळीत

Mahalaxmi Express Update | उल्हास नदीला अचानक पाणी आल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा अजब दावा, आधी आम्हाला काही वॉर्निंग मिळाली नव्हती, जेवण आणि मेडिकल सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचीही माहिती
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात यश, 600 प्रवाशांनाही सुखरुप स्थळी पोहचवलं
वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील 500 जणांना एनडीआरएफ आणि नौदलाच्या टीमने बाहेर काढलं आहे
रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन मागील सव्वा तासापासून वीर स्टेशनवर अडकली, रेल्वेकडून कोणतीही अनाऊन्समेंट नाहीhttps://t.co/yXFmiWer4s pic.twitter.com/t1rvS8wdJ6— ABP माझा (@abpmajhatv) July 27, 2019
रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन मागील सव्वा तासापासून वीर स्टेशनवर अडकली, रेल्वेकडून कोणतीही अनाऊन्समेंट नाहीhttps://t.co/yXFmiWer4s pic.twitter.com/t1rvS8wdJ6— ABP माझा (@abpmajhatv) July 27, 2019
वांगणी-बदलापूर दरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांपर्यंत मदत कार्य पोहचवण्यासाठी एअर फोर्सची दोन हेलिकॉप्टर्स पाहणी करण्यासाठी मुंबईतून रवाना होणार. मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष, पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात
पुणे : पुणे शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची संततधार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समुहातील चार धरणांच्या पाणीसाठ्यात रात्रीत 1.35 टीएमसीने वाढ
कल्याण : वरबजवळील पेट्रोल पंप पाण्याखाली, पेट्रोल पंपावरील अनेक गाड्या पाण्याखाली, जवळपास 100 लोक पेट्रोल पंपावर अडकले, अडकलेल्या लोकांची 'एबीपी माझा'कडे मदतीचा मागणी
मुंबई विमानतळावरुन कमी दृश्यमानतेमुळे आतापर्यंत उड्डाण करणारी 11 विमानं रद्द तर 9 विमानांची वाहतूक वळवली
रत्नागिरी : मुसळधार पावसाचा चिपळूण, राजापूरला फटका, थेट बाजारपेठेत पाणी, अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घराबाहेर गुडघाभर पाणी
कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाबाहेर नाल्याचं पाणी रस्त्यावर, 4 फूट पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक थांबवली, चाळीत पाणी भरल्याने लोकांना बाहेर काढलं
सातारा : कोयणा महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस, कोयणेत 260 मिलीमीटर पाऊसाची नोंद तर महाबळेश्वरमध्ये 250 मिलीमीटर पाऊस, सातारा शहरातही मुसळधार पाऊस
मुंबई शहरासह उपनगराला पावसाने झोडपलं, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने, कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद
मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट परिसरात पाणी साचलं
अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची संततधार, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
पार्श्वभूमी
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे.
गेल्या 24 तासात मुंबईत 50 ते 100 मिमी तर उपनगरांमध्ये 150 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये 192 मिमी तर कुलाब्यात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कल्याण, बदलापूर अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -