PM Vidyalaxmi Scheme: विद्यार्थ्यांना पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी  शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे एक ऑनलाईन पोर्टल लॉन्च केली आहे. या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या बँखांकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात. सोबतच या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करू शकतात. याच पार्श्वभूमीवर या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं? अर्ज कसा करावा? हे जाणून घेऊ या..


अर्ज कसा करावा?  


पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत अर्जप्रक्रिया सोपी कशी होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना सर्वांत अघोदर पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर अर्जाची सर्व प्रक्रिया तसेच या योजनेसंदर्भातील माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.   '


सर्वांत अगोदर रजिस्ट्रेसन करा 


विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अगोदर त्यांचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जाऊन त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नाव, पत्ता, इमेल आयडी आदी माहिती भरून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही या संकेतस्थळावर भविष्यात लॉग इन करू शकाल.   


आता अर्ज भरा 


विद्यार्थ्यांनी लॉगीन केल्यावर संकेतस्थळावर नवे पेज खुले होील. त्यावर तुम्हाला विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती भरा. ही माहिती भरताना तुम्हाला शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न तसेच इतर माहित द्यावी लागेल.


डॉक्यूमेंट्स अपलोड करा


विद्यालक्ष्मी योजनेचा लभ घेण्यासाठी अर्ज भरताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र (लागू असेल तर), रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा यात समावेश आहे. 


वर दिलेलली सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही हा अर्ज पुन्हा एकदा तपासायचा आहे. सर्व माहिती योग्य भरलेली आहे की नाही हे पाहायचे आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज संकेतस्थळावर जमा करावा. 


तुम्ही तुमचा अर्ज जमा केल्यानंतर तो तपासला जाईल. तुमचा अर्ज स्वीकारण्यात आल्यास तशी माहिती तुम्हाला ई-मेल आमि मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून दिली जाईल. अशा प्रकारे तुम्ही विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकता. 


हेही वाचा :


मोठी बातमी! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये उत्साह, बिटकॉइनने गाठली सर्वोच्च किंमत 


आणखी एक IPO आला रे, लिस्टिंगच्या आधीच सगळीकडे चर्चा, GMP वर तुफान प्रतिसाद!


बँकेत नोकरी हवीय का? 1500 पदांसाठी भरती प्रकिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI