आणखी एक IPO आला रे, लिस्टिंगच्या आधीच सगळीकडे चर्चा, GMP वर तुफान प्रतिसाद!
नोव्हेंबर महिन्यात आनेक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. रोसमेर्टा डिजिटल सर्व्हिसेस नावाचा आयपीओ येत्या 18 नोव्हेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला यात गुंतवणूक करता येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने आयपीओसाठी शेअरचे मूल्य 147 रुपये प्रति शेअर असे ठेवले आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र या आयपीओने सध्या ग्रे मार्केटमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. हा आयपीओ एकूण 206.33 कोटी रुपयांचा आहे.
रोसमेर्टा डिजिटल सर्व्हिसेस या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ 30 रुपयांच्या प्रिमियमवर ट्रेड केला जातोय.
रोसमेर्टा डिजिटल सर्व्हिसेस या कंपनीच्या ग्रे मार्केटमधील स्थितीवरून हा शेअर साधारण 177 रुपयांवर शेअर बाजारावर लिस्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच निर्धारित मूल्यांपेक्षा 20 टक्के अतिरिक्त किमतीवर ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.
रोसमेर्टा डिजिटल सर्व्हिसेस ही कंपनी मुंबई शेअर बाजारातील SME प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध होणार आहे. या कंपनीच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 1000 शेअर्स असतील. म्हणजेच या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे कमीत कमी 147000 रुपये असणे गरजेचे आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांंकेतिक फोटो