US Election Cryptocurrency Hits New Record : अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कमला हॅरिस (Kamala Harris) या पिढाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही (cryptocurrency) उत्साह संचारल्याचे दिसत आहे. आज बिटकॉइनसह अनेक चलनांच्या किंमती वधारला असून बिटकॉइनने (Bitcoin) आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली आहे. डॉजकॉइनमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, आज क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये खूप वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोटा उत्साह पाहायला मिळत आहे. बिटकॉइनने आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली आहे. ट्रम्पचा यांचा निवडणुकीत विजय झाल्यास डिजिटल मालमत्ता क्षेत्राला खूप पुढे नेऊ शकतो. या आशावादामुळे क्रिप्टोची किंमत वधारत आहे. निवडणूक प्रचारात त्यांनी अमेरिकेला जागतिक क्रिप्टो हब बनवण्याचे आश्वासन दिले होते.
बिटकॉइनच्या किंमतीत 8 टक्क्यांहून अधिक तेजी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आज, बिटकॉइनच्या किंमतीत 8 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली आहे. किंमती 75 हजार डॉलर्सच्या पुढे पोहोचल्या आहेत. आतापर्यंतचा उच्चांक असून रुपयाच्या बाबतीत क्रिप्टोची किंमत आता 63 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्याचवेळी, डॉजकॉइन, अमेरिकन उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची आवडती क्रिप्टोकरन्सी, 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळवला ऐतिहासिक विजय
सलग तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपद काबीज केलंय. विजयासाठी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज असताना ट्रम्प यांनी 277 चा आकडा पार केलाय. ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला. बहुमत गाठलेल्या ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांसमोर विजयी भाषण करत अमेरिकन मतदारांचे आभार मानले. आपण इतिहास घडवला, आता बेकायदा लोक अमेरिकेत येणार नाहीत अशी गर्जना ट्रम्प यांनी केली. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला सिनेटच्या निवडणुकीतही बहुमत मिळालंय. रिपब्लिकन पार्टीला 51 तर कमला हॅरीस यांच्या डेमोक्रेटीक पार्टीला 42 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान. याचा परिणाम मार्केटवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज बिटकॉइनसह अनेक चलनांच्या किंमती वधारला असून बिटकॉइनने (Bitcoin) आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली आहे. डॉजकॉइनमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: