UPSC Interview Questions : UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न देशातील अनेक तरूण-तरूणी बघतात. प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेत हे परीक्षार्थी उत्तीर्णही होतात. पण, अनेकदा यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये विचारलेले प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळा ठरतात. कधी कधी हे प्रश्न खूप सोपे असतात, पण ते विचारण्याच्या पद्धतीमुळे उमेदवार गोंधळून जातो आणि तो अधिकारी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडतो. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.


1. प्रश्न - जर तुम्ही निळ्या समुद्रात लाल दगड ठेवला तर काय होईल?
उत्तर - दगड ओला होईल आणि बुडेल.


2. प्रश्न - जे बाहेर फुकट आणि दवाखान्यात पैसे देऊन मिळते ते काय आहे?
उत्तर - ऑक्सिजन.


3. प्रश्न - तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही?
उत्तर - सूर्यास्ताला पाहून कोणीही त्याला वाचवायला येत नाही. 


4. प्रश्न - 10 रुपयांना काय विकत घ्यावे जेणेकरून संपूर्ण खोली भरली जाईल?
उत्तर - मी 10 रुपयांना अगरबत्ती किंवा मेणबत्त्या विकत घेईन, ज्यामुळे संपूर्ण घर त्याच्या प्रकाशाने आणि सुगंधाने भरून जाईल.


5. प्रश्न - ती कोणती वस्तू आहे जी खाण्यासाठी विकत घेतली जाते पण खाल्ली जात नाही?
उत्तर - प्लेट.


6. प्रश्न - कोणता प्राणी जखमी झाल्यावर माणसांप्रमाणे रडतो?
उत्तर - अस्वल.


7. प्रश्न - आपण पाणी का पितो?
उत्तर - कारण आपण पाणी खाऊ शकत नाही, चर्वण करू शकत नाही.


8. प्रश्न - कोणता प्राणी पाणी पीत नाही?
उत्तर - कांगारू उंदीर.


9. प्रश्न - कोणत्या देशात दरवर्षी राष्ट्रपती निवडला जातो?
उत्तर - स्वित्झर्लंड.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI