Tricky Interview Questions and Answers : UPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुणांकडून मेहनत घेतली जाते. दरवर्षी देशातील लाखो तरुण अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत ही परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. युपीएससी परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा अत्यंत अवघड मानला जातो. मुलाखतीत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. हा टप्पा पार करणं अवघड असतं. पाहुयात असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं... 


प्रश्न : इंग्रज त्यांच्या नावापुढे लॉर्ड का लावतात?
उत्तर : लॉर्ड हा समिती युगाचा शब्द आहे. ज्याचा अर्थ मालक, स्वामी असा होतो. इंग्लंडमध्ये हा आदराचा शब्द आहे, म्हणून लोक त्याचा वापर करतात.


प्रश्न : देशाचे पहिले महाधिवक्ता?
उत्तर : एम.सी. सेतलवाड (M. C. Setalvad)


प्रश्न : वकील नेहमी काळा कोट का घालतात?
उत्तर : काळ्या रंगाचा कोट शिस्त आणि आत्मविश्वास दर्शवतो


प्रश्न : अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे?
उत्तर : व्हॅलेंटिना तेरेश्कोवा (Valentina Tereshkova)


प्रश्न : आपल्या देशाच्या पहिल्या संरक्षण मंत्र्याचे नाव काय?
उत्तर : सरदार बलदेव सिंह (Sardar Baldev Singh)


प्रश्न : कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत?
उत्तर : गुरू ग्रह (Jupiter)


प्रश्न : देशातील लोकसभेचे पहिले सभापती ?
उत्तर : जी. व्ही. मावळंकर (G. V. Mavalankar)


प्रश्न : आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru)


प्रश्न : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर : प्रतिभा पाटील (Pratibha Patil)


प्रश्न : मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?
उत्तर : भुवया (Eye Brow)


प्रश्न : झिरो बजेट नैसर्गिक शेती (Natural Farming) म्हणजे काय?
उत्तर : कृषी क्षेत्रातील ही एक नवीन पद्धत आहे. त्याचा उद्देश शेतीमध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर करणं हा आहे आणि यासाठी खूपच कमी बजेट किंवा शून्य रुपयांचा खर्च येतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI