UPSC CSE Final Result and Merit List 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)  नागरी सेवा परीक्षा 2021 (Civil Service Exam 2021) चा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता आहे. युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवार upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. 


आत्तापर्यंत UPSC ने निकाल जाहीर करण्याची कोणत्याही तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. मात्र मागील वर्षाच्या निकालाचा विचार करता 30 मे 2022 रोजी अंतिम निकाल लागण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) साधारणपणे शेवटच्या मुलाखतीच्या तारखेनंतर दोन दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची पद्धत आहे.


निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार खालीप्रमाणे त्यांचा निकाल ऑनलाइन तपासू शकतील. अधिकृत वेबसाइटची यादी खाली दिली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखील गुणवत्ता यादी अपलोड करणे अपेक्षित आहे. UPSC CSE मेरिट लिस्ट 2021 द्वारे उमेदवारांना त्यांची अखिल भारतीय रँक (AIR) कळेल.


गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2020 ची मुख्य मुलाखत फेरी 2 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर 24 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया 26 मे 2022 रोजी संपली. त्यामुळे UPSC CSE 2021 चा अंतिम निकाल सोमवारी 30 मे रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI