Beauty Tips : जर तुम्हीही चेहऱ्यावर खोबरेल तेल (Coconut Oil) वापरत असाल तर सावध व्हा. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. नारळाच्या तेलात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतात. उन्हाळ्यात खोबरेल तेल लावल्याने टॅनिंग टाळता येते. मात्र, परंतु खोबरेल तेल प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेवर किती उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही.


ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी चेहऱ्यावर खोबरेल तेलाचा वापर करू नये. खोबरेल तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते, कसे ते जाणून घ्या.


मुरुमांचा धोका
ज्या व्यक्तींना मुरुमांचा त्रास आहे किंवा उन्हाळ्यात चेहरा जास्त तेलकट होतो, त्यांनी चेहऱ्यावर तेल लावू नये. चेहऱ्यावर तेलाचे प्रमाण वाढल्यामुळे, दूषित हवेचे कण त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा होतात, ज्यामुळे मुरुम येण्याचा धोका वाढतो.


तेलकट त्वचा
उन्हाळ्यात काही लोकांची त्वचा तेलकट होते. अशा परिस्थितीत खोबरेल तेलाने मसाज केल्याने तुमची त्वचा आणखीनच तेलकट होऊ शकते, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा वापर करू नका. त्यामुळे त्वचेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.
 
चेहऱ्यावरील केसांची समस्या
चेहऱ्यावर खोबरेल तेलाचा सतत वापर केल्यास चेहऱ्यावरील केस वाढण्याचा धोका असतो. चेहऱ्यावर तेल लावल्याने केस तर वाढतातच पण दाटही होऊ लागतात, त्यामुळे चेहऱ्यावर खोबरेल तेल वापरू नका. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर खोबरेल तेल  वापरणे आजच बंद करा.


त्वचेवर ऍलर्जी
खोबरेल तेल प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेला शोभत नाही. खोबरेल तेल वापरल्याने काही व्यक्तींच्या त्वचेवर ऍलर्जी होण्याची शक्यता असते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी चेहऱ्यावर खोबरेल तेल वापरणं टाळावं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator