UPSC NDA Results 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या परीक्षेचा (NDA) निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल यूपीएसीच्या अधिकृत वेबसाईतवर आज सांकाळी 7 वाजता जाहीर झाला आहे.  या परीक्षेला बसलेले उमेदवार upsc.gov.in या यूपीएसीच्या अधिकृत वेबसाइटवरून आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतात.

Continues below advertisement


एनडीएच्या 149 व्या तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेची लेखी परिक्षा 10 एप्रिल 2022 रोजी झाली होती. त्यानंतर आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीएची ही लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या  मुलाखतीची प्रक्रिया होणार आहे. यूपीएससीने याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे.  


एनडीएची ही लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील दोन आठवड्यात आपली नोंदणी करणे आवश्‍यक आहे. सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एसएसबी केंद्र आणि तारखा निवडण्यासाठीसाठी माहिती पाठविण्यात येणार आहे. 


असा पाहा निकाल 


यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाइटला भेट द्या. 


मुख्यपृष्ठावरील UPSC NDA 1 निकाल 2022 डाउनलोड लिंकवर क्लिक करा.


त्यानंतर निकालाची PDF मेरिट लिस्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


या मेरिट लिस्टमध्ये तुमचा रोल नंबर तपासा.


ही PDF मेरिट लिस्ट  डाउनलोड करा आणि प्रिंट काढा
 


यूपीएसी एनडीए 2022 च्या परीक्षेची अॅन्सर की 
एनडीएच्या या परीक्षेची अॅन्सर की आयोग आपल्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जारी करेल. या परीक्षेला बसलेले उमेदवारांना यूपीएसीच्या अधिकृत वेबसाइटवरून अॅन्सर कीची PDF डाउनलोड करता येईल.
निकाल आणि त्यापुढील प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.  


महत्वाच्या बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI