UGC New Curriculum and Credit Framework: UGC ने पदवीपूर्व कार्यक्रमांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क सुरू (New Curriculum and Credit Framework) केलं आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींवर आधारित आहे. याअंतर्गत नियमांमध्ये शिथिलता येणार असून विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत. ग्रॅज्युएशनमध्ये क्रेडिट प्रणाली लागू केली जाईल आणि एकाधिक प्रवेश आणि बाहेर पडण्याचे पर्याय देखील उघडतील. यासोबतच एका शाखेतून दुसऱ्या शाखेत जाण्याची परवानगीही दिली जाणार आहे. नवीन फ्रेमवर्कच्या खास गोष्टी जाणून घ्या.


चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नेमका कसा असणार?


चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना सर्व उच्च शैक्षणिक पात्रतेचे श्रेयकरण आणि एकात्मीकरण करण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करताना चार वर्षात प्रत्येक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कधीही प्रवेश घेण्याचा आणि बाहेर पडण्याच्या पर्यायांसह प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी मिळवता येईल


म्हणजेच विद्यार्थ्यांना चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आणि बाहेर पडताना पर्याय असतील


नवीन फ्रेमवर्कमध्ये काय बदल होतील ते जाणून घ्या


UGC नं लाँच केलेले नवीन फ्रेमवर्क हे HEI म्हणजे उच्च शैक्षणिक संस्थांसाठी आहे.
नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (CBCS) बदलण्यात आले आहे.
पदवीपूर्व कार्यक्रम तीन किंवा चार वर्षांत किंवा त्याहूनही कमी कालावधीत पूर्ण केला जाऊ शकतो आणि त्यानुसार उमेदवाराला पदवी प्रदान केली जाईल.
एक वर्ष किंवा दोन सेमिस्टर पूर्ण झाल्यावर, विद्यार्थ्यानं निवडलेल्या क्षेत्रात UG प्रमाणपत्र मिळेल. 
यूजी डिप्लोमा दोन वर्षांनी किंवा चार सेमिस्टरनंतर बाहेर पडल्यावरच देण्यात येणार आहे.  
बॅचलर पदवी तीन वर्ष, 6 सेमिस्टरनंतर आणि चार वर्ष किंवा आठ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर ऑनर्स पदवी दिली जाईल.
त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही स्तरावर प्रवेश करू शकतात किंवा कोर्समधून बाहेर पडू शकतात.
चौथ्या वर्षांनंतर, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 6 सेमिस्टरमध्ये 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत, ते संशोधन प्रवाह निवडू शकतात. हे संशोधन मेजर डिसिप्लीनमध्ये करता येते.
विद्यार्थी एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाऊ शकतात. तसेच ODL, ऑफलाइन किंवा हायब्रीड सारख्या शिक्षणाची पद्धत बदलू शकतात.
नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती देखील मिळू शकते. परंतु त्यांना जास्तीत जास्त 7 वर्षांमध्ये पदवी पूर्ण करावी लागेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


नव्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना, कसा असणार अभ्यासक्रम?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI