4-Year UG Programmes : येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा कौशल्यांवर आधारित पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra Government) घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व विद्यापीठांना दिले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) माजी प्र कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. आता या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार अंमलबजावणीच्या अनुषंगाने, तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासोबत चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या आराखड्याची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून जारी केल्या आहेत.
समितीने दिलेल्या अहवालातील शिफारसीनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (National Education Policy) पुढील आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (NCrF) तयार करण्यात आला आहे
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नेमका कसा असणार?
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना सर्व उच्च शैक्षणिक पात्रतेचे श्रेयकरण आणि एकात्मीकरण करण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करताना चार वर्षात प्रत्येक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कधीही प्रवेश घेण्याचा आणि बाहेर पडण्याच्या पर्यायांसह प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी मिळवता येईल
म्हणजेच विद्यार्थ्यांना चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आणि बाहेर पडताना पर्याय असतील
ज्यामध्ये भविष्यातील करिअरच्या गरजेनुसार विद्यार्थी विषम सेमिस्टरमध्ये (1,3,5,7) प्रवेश घेऊ शकेल आणि सम सेमिस्टर (2,4,6,8) मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर यशस्वीरित्या बाहेर पडू शकतो
- विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या अभ्यासक्रमध्ये 2 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल (किमान 40 क्रेडिट्सची आवश्यकता)
- दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 4 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल (किमान 80 क्रेडिट्स आवश्यकता)
- तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 6 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर बॅचलर पदवी मिळेल (किमान 120 क्रेडिट्स आवश्यकता)
- चार वर्षांचा अभ्यासक्रमामध्ये 8 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर संशोधन किंवा स्पेशलायझेशनसह सन्मानपूर्वक (ऑनर्ससह ) बॅचलर पदवी मिळेल (किमान 160 क्रेडिट्स आवश्यकता)
- विद्यार्थी चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी सम सेमिस्टर पूर्ण करुन बाहेर पडल्यावर विद्यार्थ्याला पुन्हा त्याच ठिकाणी किंवा वेगळ्या उच्च शिक्षण संस्थेत पुन्हा प्रवेश घेण्याचा पर्याय असेल.
चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमच्या रचनेसोबत कधीही प्रवेश घेण्याच्या आणि बाहेर पडण्याचा पर्यायांसह पाच वर्षांच्या एकात्मिक बहु-विद्याशाखीय पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रम पूर्ण करता येईल
पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी (मास्टर्स) डिग्री मिळवण्यासाठी काय पर्याय असणार?
जर विद्यार्थ्याने तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करुन बॅचलर पदवी मिळवली असेल तर त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष चार सेमिस्टर पूर्ण करावे लागतील त्यानंतर त्याला मास्टर्स डिग्री मिळेल
किंवा
जर विद्यार्थ्याने चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करुन संशोधन किंवा स्पेशलायझेशनसह सन्मानपूर्वक (ऑनर्स) पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक वर्ष दोन सेमिस्टर पूर्ण करावे लागतील, त्यानंतर त्याला मास्टर्स डिग्री मिळेल
बहु-विद्याशाखीय चार वर्षांच्या पदवी कार्यक्रमात क्रेडिट्सचे वितरण
(1) सन्मानपूर्वक (ऑनर्स) स्पेशलायझेशन पदवीसह चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी कार्यक्रमात चौथ्या वर्षात प्रति सत्र किमान 20 क्रेडिट्ससह इंटर्नशिप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील.
(2) संशोधन पदवीसह चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षात किमान 20 क्रेडिट्ससह संशोधन प्रकल्प, सेमिनार, प्रबंध आणि इंटर्नशिप असतील.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI