UPSC Interview Questions : युपीएससी परीक्षेसाठी अनेकजण वर्षभर तयारी करत असतात. त्यानंतरही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा परीक्षेचा टप्पा असतो. IAS स्तरावरील मुलाखतीसाठी तुमची तयारीदेखील त्याच पातळीची असली पाहिजे. मुलाखतीच्या पॅनेलमध्ये असलेले अधिकारी तुमची तर्कशक्ती पाहण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात.
युपीएससीच्या मुलाखतीत अनेकदा प्रश्न सोपा असतो. मात्र, काही उमेदवार उत्तर देण्यात चुकतात. अनेकदा काही प्रश्नांची उत्तरे ही प्रश्नातच असतात. मात्र, मुलाखतीच्या तणावामुळे अथवा काही कारणाने उत्तरं देण्यास उमेदवार चुकतात. असेच काही प्रश्न येथे आहेत, ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न- शिव आणि शंकर दोघे एकच आहेत का? की वेगवेगळे आहेत
उत्तर- शिव म्हणजेच शंकर. असे मानले जाते की त्यांच्या जीवन आणि मृत्यूचा कोणताही उल्लेख नाही. शिव शंकर हे अमर्याद शक्तीचा देव समजले जातात.
प्रश्न- महिलांचा बुद्ध्यांक कमी असतो का?
उत्तर- सेफेलिक इंडेक्सनुसार महिलांचा बुद्ध्यांक कमी नसतो. मात्र, महिलांचे वर्षानुवर्षे शोषण झाले आहे. त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ किंवा संधी दिली गेली नाही. महिलांचा बुद्ध्यांक कमी आहे असे म्हणणे योग्य नाही.
प्रश्न : ट्रकचालक चुकीच्या बाजूने जात असेल तर पोलिसांनी त्याला का थांबवले नाही?
उत्तर : ट्रकचालक पायी जात होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवले नाही.
प्रश्न- भारतातील सर्वात महागडी ट्रेन कोणती आहे?
उत्तर- महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन आहे.
प्रश्न- कोणत्या जीवाची हाडे सर्वात मजबूत असतात?
उत्तर- वाघाची हाडे सर्वात मजबूत असतात.
प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे की कापल्यानंतर लोक आनंदी होतात
उत्तर- केक कापल्यानंतर लोक आनंदी होतात. केक कापणे हे आनंदाचे प्रतीक मानले जाते.
प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही?
उत्तर- बर्फ ही अशी वस्तू आहे जी आगीत जळत नाही आणि पाण्यात बुडत नाही.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI