मुंबई: देशभरातील लाखो युवकांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करायचं असतं, मोठ्या पदावर जायचं असतं. त्यासाठी परीक्षार्थी जीवतोड मेहनत घेत असतात. यामध्ये यशस्वी होण्यासाठी तीन टप्प्यातून जावं लागतं, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पहिल्या दोन परीक्षांमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीला सामोरं जावं लागतं. या मुलाखतीमधील अनेक प्रश्न साधे-सरळ असतात. पण त्याची उत्तर विचारपूर्वक द्यावी लागतात. यावेळी मुलाखत देणाऱ्याच्या प्रसंगावधानाची परीक्षा असते. आज असेच काही साधे प्रश्न पण त्याची उत्तर काहीशी ट्रिकी स्वरूपाची असू शकतात. आज आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. 


प्रश्न: असा कोणता सजीव आहे ज्याला कान आणि डोळंही नसतात? 
उत्तर: गांडूळ


प्रश्न: कोणत्या जनावराला तीन डोळे असतात? 
उत्तर: तुवातारा


प्रश्न: जगात असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी शेती नाही?  
उत्तर: सिंगापूर


प्रश्न: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते? 
उत्तर: सल्फर


प्रश्न: एका वर्षात किती तास असतात? 
उत्तर: 8760


प्रश्न: एक हत्ती आपल्या सोंडेमध्ये किती पाणी ठेऊ शकतो? 
उत्तर: पाच लिटर


प्रश्न: एका महिन्यात किती तास असतात? 
उत्तर: 730.001 


प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्याभरात एकदाच येते आणि 24 तासांच्या आत गायब होते? 
उत्तर:  तारीख


प्रश्न: कोणत्या जनावराची हाडे सर्वाधिक मजबूत असतात?  
उत्तर: वाघ


प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यातही जळू शकते?
उत्तर: सोडिअम आणि पोटॅशिअम


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI