Maharashtra SSC Result 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून निकालाची (SSC result) आतुरता लागली होती. तो निकाल आज (17 जून) जाहीर झालाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. महत्वाचं म्हणजे, यावर्षी दहावीच्या परिक्षेत तब्बल 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले. या यादीत लातूरचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. 


यंदाच्या दहावीच्या परिक्षेत 100 गुण मिळणाऱ्यांमध्ये लातूरचे विद्यार्थी सर्वाधिक आहेत. लातूरमध्ये 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर औरंगाबाद आणि कोल्हापूर यांचा क्रमांक लागतो. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 18-18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवून आपल्या शाळेचं नाव मोठं केलंय. त्यानंतर यादीत अमरावती 8, पुणे 5, मुंबई 1, नाशिक 1 आणि कोकणमधील एक विद्यार्थी आहे.


राज्यातील टक्केवारी
राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली. 


यावर्षी 52 हजार फेरपरीक्षार्थी
राज्यातील 9 विभागातून एकूण 54 हजार 159 विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी (रिपीटर) नोंदणी केली. त्यापैकी 52 हजार 351 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले. त्यापैकी 41 हजार 390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 79.06 आहे.


दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी  MH10.ABPMajha.Com  या लिंकवर क्लिक करा.


हे देखील वाचा- 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI