Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीचा निकाल जाहिर झाला असून विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची तारीख दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी प्रति विषय 50 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.

Continues below advertisement

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागेल.

छायांकित प्रती मिळण्यासाठी काय करावे लागेल?

Continues below advertisement

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती अर्था फोटो कॉपी (Photo Copy) मागणीसाठी  ई-मेलद्वारे, संकेतस्थळ किंवा पोस्ट यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार त्यांना छायांकित प्रती उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे सोमवार  दिनांक 20 जून ते शनिवार 09 जुलैपर्यंत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे लागेल.

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायांकित प्रत मिळालेल्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रती विषय 300 रुपये शुल्क आकारले जाईल. 

विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकदहावीच्या निकालानतर विद्यार्थ्यांना निकाल आणि त्यासंदर्भात येणाऱ्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना निकालानंतर पुढे आठ दिवस यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.

दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकालयंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी  MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI