IMDB Top 5 Web Series : लोकांना मनोरंजनासाठी चित्रपट किंवा वेब सिरीज बघायला आवडतात. ओटीटी प्लॅटफोर्मवरील (OTT PLatforms) वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शन असणाऱ्या सीरिज प्रेक्षक आवडीनं पाहतात. आयएमडीबीकडून चांगले रेटिंग्स देण्यात आलेल्या वेब सीरिज तुम्ही या विकेंडला पाहू शकता. या वीकेंडला तुम्हा आयएमडीबीच्या टॉप-5 (IMDB Top 5 Web Series)  वेब सीरीज पाहू शकता. 


स्कॅम 1992 (Scam 1992)
उद्योगपती हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित असणाऱ्या स्कॅम 1992 या वेब सीरिजनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आयएमडीबीवर या सीरिजला  9.3 रेटिंग देण्यात आलं आहे. ही सीरिज तुम्ही सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहात. या वेब सीरिजच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


एस्पिरेंट्स (Aspirants)
आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट दाखवणारी एस्पिरेंट्स ही वेब सीरिज यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. आयएमडीबीनं या सीरिजला 9.3 रेटिंग दिलं आहे. तुम्हाला ही सीरिज नक्कीच आवडेल. या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  


कोटा फॅक्ट्री  (Kota Factory)
प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र कुमारनं कोटा फॅक्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये कोटा येथे आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आयएमडीबीनं या सीरिजला 9.1 रेटिंग दिलं आहे. 


पंचायत (Panchayat) 
पंचायत या वेब सिरीजमध्ये जितेंद्र कुमार देखील आहे त्यामध्ये गावच्या पंचायत सचिवाची भूमिका साकारली आहे. कथा फुलेरा नावाच्या गावाची आहे, जिथे तुम्हाला गावाशी संबंधित सर्व गोष्टींचा पुरेपूर आनंद मिळेल. या सीरिजला 8.9  रेटिंग देण्यात आलं आहे. 


रॉकेट बॉइज (Rocket Boys)
रॉकेट बॉइज ही सीरिज सोनी लिव अॅपवर तुम्ही पाहू शकता. या सीरिजला 8.9 रेटिंग  देण्यात आलं आहे. डॉ. होमी जहांगीर भाभा आणि  डॉ. विक्रम साराभाई यांची स्टोरी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 


हेही वाचा :