पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. पराग काळकर (Dr. Parag Kalkar) यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण या नियुक्तीवर स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड्स अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  प्र-कुलगुरुपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करुन नेमके काय साध्य करायचे आहे? ही नियुक्ती ही राजकीय दबावातूनच झाली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे. काळकरांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?


विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  प्र-कुलगुरुपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करुन नेमके काय साध्य करायचे आहे? सदर नियुक्ती ही राजकीय दबावातूनच झाली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी. 


ते पुढे लिहितात की, "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऐतिहसिक पार्श्वभूमी आहे. चरित्र जोपासना हे विद्यापीठाचे काम आहे.  प्र-कुलगुरुंची (प्रो व्हीसी) निवड हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून जो विद्यापीठाच्या भविष्यकालीन वाटचालीवर आणि विद्यापीठाच्या प्रशासन तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करु शकतो. प्र-कुलगुरुपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नियुक्तीने केवळ तात्काळ शैक्षणिक परिदृश्यावर परिणाम होणार नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीवरही त्याचा परिणाम होणार आहे. पण विद्यापीठात जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. यातून नेमके काय साध्य करायचे आहे? प्र-कुलगुरु भ्रष्टाचार किंवा गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपांपासून मुक्त असावे. तसेच त्यांचा रेकॉर्ड निर्दोष असण्याची जोरदार मागणी होत असताना प्र-कुलगुरुंची स्वच्छ प्रतिमा असावी आणि कोणत्याही प्रकारच्या आरोपाखाली त्यांचे नाव नसावे. अशी अपेक्षा विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या व विद्यापीठ समुदायाच्या एका वर्गाने व्यक्त केली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्नही त्यांनी ट्वीटच्या मार्फत उपस्थित केला आहे. 


गुन्हे असताना नियुक्ती कशी केली?


ते पुढे लिहितात की, डॉ. पराग काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता (डीन) होते. 2017 ते 18  या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हे केले होते. पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यात IPC 406, 409, 420 असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यांवर दाखल आहेत. असे असताना कुठलीही शहानिशा न करता, ही नियुक्ती कशी झाली? हा गंभीर प्रश्न आहे. अशाच नियुक्त्या करायच्या असतील तर संपूर्ण प्रक्रिया राबवण्याची गरजच काय? राजकीय नियुक्त्या असतील तरी थोडी खातरजमा करुन त्या केल्या जाऊ शकतात. पण, अशा नियुक्त्या करुन आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छितो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


इतर महत्वाची बातमी-



Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती




Education Loan Information:

Calculate Education Loan EMI