π Day : गणित आणि भौतिक तज्ज्ञांसाठी आजचा दिवस विशेष. आज जागतिक स्तरावर खासकरुन अमेरिकेत Pi Day (π Day) साजरा केला जातो. हा तोच पाय आहे ज्याचा वापर केल्याशिवाय आपल्याला गणितं सोडवता येत नाहीत. पायची किंमत ही 22/7 किंवा 3.14 अशी आहे. आजच्याच दिवशी पाय दिवस का साजरा केला जातोय याचंही एक विशेष कारण आहे. आज मार्च महिना म्हणजे वर्षातला तिसरा महिना आणि 14 तारीख आहे. पायची किंमतही 3.14 अशी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पाय दिवस साजरा केला जातोय. 


भौतिक शास्त्रज्ञ असलेल्या लॅरी शॉ यांनी सर्वप्रथम 1988 साली सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियम मध्ये पाय दिवसाचे आयोजन केलं होतं. त्यांना “The Prince of π” या नावानेही ओळखलं जातं. 2009 साली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या प्रतिनिधींनी 14 मार्च हा दिवस पाय दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. त्या आधी पाय दिवस हा जुलै महिन्याच्या 22 तारखेला साजरा करण्यात येत होता. पायची दुसरी किंमत ही 22/7 अशीही आहे. 


 






Janaushadhi divas | जेनेरिक औषधांमुळे गरीबांना स्वस्त औषधे आणि युवकांना रोजगार मिळाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी


प्रिन्सटन, न्यू जर्सीच्या वतीनं पाय दिवस आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्मदिवस संयुक्तपणे साजरा केला  जातो. आईनस्टाईन यांनी आपल्या आयुष्यातील 20 वर्षापेक्षा जास्त काळ हा प्रिन्सटनमध्ये घालवला. 


π चा वापर
नद्यांची लांबी मोजण्यासाठी पाय चा उपयोग होऊ शकतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पायचा वापर करुन नद्यांची लांबी मोजण्याचा प्रयत्न केला होता. पायचा वापर करुन गणिततज्ज्ञ पिरॅमिडचा आकार मोजला जातो.  अवकाशातील दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी, त्यांच्यातील अंतराचा हिशोब लावण्यासाठीही पायचा उपयोग होऊ शकतो. पायच्या किंमतीचा वापर करुन आपण आपल्या ब्रम्हांडचा आकार अंडाकार आहे या तथ्यापर्यंत पोहोचलो आहे. स्पेस सायन्समध्ये π चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. 


पायची किंमत ही 22/7 म्हणजेच 3.141592653589793238..... अशी अनंत आहे. जगातल्या अनेक शाश्त्रज्ञांनी याच्या निश्चित मूल्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला पण अद्याप कुणालाही यश आलं नाही. 


International Women’s Day 2021 | गुगल डुडलकडून नारीशक्तीला अनोखी मानवंदना, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला महिलांचा प्रवास


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI