नवी दिल्ली : आज देशभर 'जन औषधी दिवस' साजरा केला जातोय. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातल्या 7500 व्या जेनेरिक औषधांच्या केंद्राचं उद्धाटन केलं आहे. या माध्यमातून देशातल्या जनतेला स्वस्तामध्ये औषधांचा पुरवठा केला जातोय.


जनऔषधी दिवसानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला जनतेला जेनेरिक केंद्रातून स्वस्त औषधे खरेदी करण्याचे आवाहन केलं. जेनेरिक औषधांच्या माध्यमातून देशातील जनतेला स्वस्तात औषधे मिळतात त्याचबरोबर देशातील युवकांना रोजगारही मिळतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जेनेरिक केंद्रावर महिलांना आणि मुलींना केवळ अडीच रुपयात सॅनेटरी पॅड उपलब्ध होतात. आतापर्यंत जवळपास 11 कोटी सॅनेटरी नॅपकिनची विक्री करण्यात आली आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापुढे जेनेरिक औषधे केंद्रावर 75 प्रकारची आयुष औषधे उपलब्ध करण्यात येतील.


International Women’s Day 2021 | जागतिक स्तरावर महिला खासदारांचे प्रमाण आतापर्यंत सर्वाधिक; Inter-Parliamentary Union चा अहवाल


जेनेरिक औषधे ही इतर औषधांच्या तुलनेत 50 ते 90 टक्के स्वस्त आहेत. 2014 साली देशात जेनेरिक औषध केंद्रांची संख्या 86 होती. आता या केंद्रांची संख्या ही 7,500 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या आर्थिक आकडेवारीवर लक्ष टाकल्यास असं दिसून येतं की या जेनेरिक औषधांमुळे भारतीयांच्या जवळपास 3600 कोटी रुपयांची बचत झाली आहे. या जेनेरिक औषधे केंद्रापैकी 1000 केंद्रे अशी आहेत की जी महिलांकडून चालवली जातात. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून भारतीय मुली या आत्मनिर्भर होत आहेत. आज मेड इन इंडियाच्या औषधांना जगभरात मागणी आहे


जेनेरिक औषधांबद्दल देशातील नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 'जेनेरिक मेडिसिन सप्ताह' पाळण्यात येत आहे. 'जेनेरिक मेडिसिन-सेवा आणि रोजगार' अशी त्याची थीम आहे.


West Bengal | सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, पंतप्रधानांच्या रॅलीतही नसणार