Allama Iqbal Death Anniversary: जेव्हा देशभक्तीचा विचार येतो तेव्हा आपल्या भारतीयांच्या मनात एक गीत नक्कीच येते, ते म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा'.. हे गीत त्या काळातील प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी 1905 मध्ये लिहिले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा मध्यरात्री ठीक 12 वाजता संसद भवनाच्या कार्यक्रमात सर्वानी मिळून अनेक देशभक्तीच्या गीतांसह सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत देखील गायले होते.


9 नोव्हेंबर 1887 रोजी ब्रिटिश भारतातील सियालकोट येथे जन्मलेल्या इकबाल यांचे पूर्वज काश्मिरी ब्राह्मण होते. इक्बालचे पूर्वज सप्रु गोत्रातील काश्मिरी ब्राह्मण होते, ज्यांनी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांचे पूर्वज व्यवसायानिमित्त जम्मूहून पंजाबमधील सियालकोट येथे स्थायिक झाले होते. त्याचे वडील शेख नूर मोहम्मद हे सियालकोटमध्ये शिंपी म्हणून काम करायचे.


कवी मोहम्मद इकबाल यांना पाकिस्तानचे 'रुहानी फादर' म्हटले जाते. भारतीय उपखंडातील महान कवींपैकी एक मानले जाणारे इकबाल यांनी पर्शियन आणि उर्दूमध्ये सुमारे 12,000 शेर लिहिले. उर्दू शायरीत त्यांना मीर तकी मीर आणि मिर्झा गालिब यांच्या बरोबरीचे कवी मानले जाते.


इकबाल यांचे प्रारंभिक शिक्षण अरबी भाषेत झाले. पुढे त्यांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घेतले. इकबाल यांनी इंग्रजी आणि अरबी हे विषय घेऊन आपली बीएची पदवी मिळवली. इकबाल यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. इकबाल यांनी ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षणही घेतले आणि ते बॅरिस्टर झाले. पुढे ते संशोधनासाठी जर्मनीला गेले. इकबाल यांनी म्युनिक येथील लुडविग मॅक्सिमिलियन विद्यापीठातून Philosophy त पीएचडी केली. 


पुढे त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना अल्लामा ही पदवी मिळाली आणि ते अल्लामा इकबाल म्हणून ओळखले जाऊ लागले. इकबाल यांनी बॅरिस्टर आणि अरबी, इंग्रजी आणि Philosophy विषयांचे शिक्षक म्हणून काम केले. इकबाल आपल्या महाविद्यालयीन काळापासूनच  राजकीयदृष्ट्या जागरूक होते. 1906 मध्ये मुस्लीम लीगची स्थापना झाली तेव्हा इकबाल त्याच्याशी संबंधित होते. इकबाल हे भारतापासून वेगळ्या मुस्लिम देशाचे समर्थक होते. इकबालचे समीक्षक त्यांना भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला तात्विक आधार देणाऱ्या विचारवंतांपैकी एक मानतात. अल्लामा इकबाल यांचे 21 एप्रिल 1938 रोजी लाहोर येथे निधन झाले.


'लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी', 'शिकवा' आणि 'जवाबे-ए-शिकवा' या त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहेत. त्यांच्या अनेक रचना हिंदी भाषिक कवींनी हिंदीत भाषांतरित केल्या आहेत. त्यातील काही प्रसिद्ध गीत आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. इकबाल यांनी 21 एप्रिल 1938 रोजी जगाचा निरोप घेतला असला तरी लोकांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. कारण माणूस मरण पावला तरी त्याचे शब्द कधीच मरत नाहीत आणि कवी आपल्या कवितेत शतकानुशतके जिवंत राहतो.


इकबाल यांचे काही प्रसिद्ध शेर 


सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा,
हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्ताँ हमारा।


खुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले,
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है।


मिटा दे अपनी हस्ती को गर कुछ मर्तबा चाहिए,
कि दाना खाक में मिलकर, गुले-गुलजार होता है।


सितारों से आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं,
तही ज़िंदगी से नहीं ये फ़ज़ाएँ
यहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं।


माना कि तेरी दीद के क़ाबिल नहीं हूँ मैं,
तू मेरा शौक़ देख मिरा इंतिज़ार देख।


नशा पिला के गिराना तो सब को आता है,
मज़ा तो तब है कि गिरतों को थाम ले साक़ी।


दिल से जो बात निकलती है असर रखती है,
पर नहीं ताक़त-ए-परवाज़ मगर रखती है।


जम्हूरियत इक तर्ज़-ए-हुकूमत है कि जिस में,
बंदों को गिना करते हैं तौला नहीं करते।


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI