Delhi Covid cases : राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परिणामी दिल्लीमध्ये बुधवारपासून मास्क वापरणे सक्तीचं करण्यात आले आहे. दिल्ली आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत दिल्लीमध्ये 1009 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर या कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील 68 दिवसांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. राजधानी दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 5.7 टक्के इतका झाली आहे. तर मृत्यूदर 1.4 टक्के इतका झाला आहे. (Corona Cases in Delhi) 


11 ते 18 एप्रिलदरम्यान राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सकारात्मक बाब म्हणजे, नव्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. बहुतांश रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतातही दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीमध्येही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुले राजधानी दिल्लीमध्ये मास्क वापरणे सक्तीचं करण्यात आले आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहून दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. 






भारतामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ - 
गेल्या 24 तासांत 2067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 340 इतकी झाली आहे.  मंगळवारी दिवसभरात देशात 1547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 13 हजार 248 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.49 टक्के इतका आहे.