Mumbai University of Health Sciences Exam : 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर वैद्यकीय शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रांच्या परीक्षा आता एक दिवसाआड घेण्यात येणार आहेत. विद्यार्थांशी संवाद साधल्यानंतर कुलगुरूंनी मुंबई आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा निर्णय जाहीर केला. या आधी या परीक्षा मध्ये कोणतीही सुट्टी न घेता सलगपणे घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. 


विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विद्यापीठाचा निर्णय


राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा एका महिन्याच्या आत घेण्यात याव्या असे निर्देश देण्यात आले होते. मुंबई आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चान्वये विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र 2024 पासून या परीक्षा एक दिवसाची सुट्टी न देता सलग घेण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. 


आयोगाच्या या निर्णयाला मात्र विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमांची काठीण्य पातळी बघता आणि विद्यार्थ्यांचा मानसिक ताण बघता या परीक्षांमध्ये एक दिवसाआड परीक्षा घेतली जावी, तशी एक दिवसाची सुट्टी दिली जावी अशी मागणी केली जात होती. 


याबाबत विद्यार्थ्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने  कुलगुरुंनी विद्यार्थ्यांसोबत झूम मिटींगद्वारे संवाद साधला. या दरम्यान एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत ऑनलाईन मतदान प्रक्रिया (Opinion Poll) राबवली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एक दिवस आड परीक्षा घ्यावी असा दिसून आला. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत सहमती झाली.


ही बातमी वाचा: 



 


Maharashtra University of Health Sciences, Mumbai University of Health Sciences Exam , 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI