CIC Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग, CIC मध्ये नोकरी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही केंद्रीय माहिती आयोगाच्या अधिकृत वेबसाइट cic.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत विभाग अधिकारी, वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव आणि खाजगी सचिव या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 22 पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 आहे. ज्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करायचा आहे, त्यांनी अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करून भरलेला अर्ज उपसचिव (प्रशासन), केंद्रीय माहिती आयोग, 5 वा मजला, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली-110067 या पत्त्यावर पाठवावा लागेल.


CIC Recruitment 2022 मधील महत्त्वाच्या तारखा 


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 


CIC Recruitment 2022 साठी महत्त्वाची माहिती 


एकूण पदांची संख्या : 22 
सिनियर प्रिंसिपल प्रायव्हेट सेक्रेटरी : 3 पदं
प्रधान खाजगी सचिव : 3 पदं
सेक्शन ऑफिसर : 8 पदं
खाजगी सचिव : 8 पदं 


CIC Recruitment 2022 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 


या भरती प्रक्रिये संदर्भातील शैक्षणिक पात्रतेबाबत माहितीसाठी अधिसूचना पाहा. या अधिसूचनेत तुम्हाला यासंदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल. वयोमर्यादा, पगार यांसदर्भातील माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट cic.gov.in वर जाऊन अधिकृत अधिसूचना वाचू शकतात. 


CIC Recruitment 2022 साठी इतर माहिती 


ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची पत्र उपसचिव (प्रशासन), केंद्रीय माहिती आयोग, 5 वा मजला, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली-110067 या पत्त्यावर पाठवावा लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI