Maharashtra State Eligibility Test Results, MH-SET 2021 OUT: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) आयोजित केलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा (Set Exam) निकाल (Result) जाहीर झाला आहे.  setexam.unipune.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार निकाल पाहू शकतात. 


26 स्पटेंबर 2021 रोजी 37वी महाराष्ट्र सेट परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. 79774 उमेदवारांनी सेट परीक्षा दिली होती. यापैकी 6.64 टक्के विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा उतीर्ण केली आहे. म्हणजेच 5,297 विद्यार्थी सेट परीक्षा पास झाले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून परीक्षा घेण्यात आली होती. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करत 26 स्पटेंबर 2021 रोजी पार पडली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित परीक्षामध्ये मुंबई आणि पुण्यात विद्यार्थ्यांची उपस्थीती कमी असल्याचे समोर आले. 




पुणे विद्यापीठाच्या setexam.unipune.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. सेट परीक्षा पात्र झालेले उमेदवार चार फेब्रुवारीपासून ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकतील. संकेतस्थळावर माहिती भरल्यानंतर निकाल पाहाता येईल. 


निकाल कसा पाहाल?
सर्वात आधी सावित्रीबाई http://setexam.unipune.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा. 
त्यानंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा. 
नवीन विंडो स्क्रीन पर दिसेल.
त्यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा. 
यानंतर आवश्यक ती माहिती भरा.. रोल नंबर, नाव, बैठक क्रमांक, जन्मतारीख आणि फोन क्रमांक भरा.. 
सबमीट करा 
निकाल डाऊनलोड करा.


महत्वाच्या बातम्या :
Job Majha : सीमा सुरक्षा दल आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये काम करण्याची संधी
Job Majha: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि नॅशनल केमिकल अॅन्ड फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha : दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरमध्ये 65 जागांसाठी भरती सुरू


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI