पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दहावी- बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्राबाबत (Maharashtra SSC Hall Ticket 2025) अपडेट समोर आली आहे. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठीच्या हॉल तिकिटावरती आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला असल्याचं दिसून येत आहे. हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणालेत शरद गोसावी?
बारावीच्या हॅाल तिकीटावर विद्यार्थ्यांच्या जातीच्या उल्लेखावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही. तर, प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे, ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख तिकिटावरती आहे. सामाजिक न्याय विभागाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यात विद्यार्थ्यांना सोय व्हावी, अडचण येऊ नये यासाठी प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखवल्यावर असतो. त्यात चुक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते. ते टाळण्यासाठी हॅाल तिकीटावर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण शरद गोसावी यांनी फोनवरून दिले आहे.
हेरंब कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे. हॉल तिकीट हे तात्पुरते आहे, मग यावर जातीचा उल्लेख करण्याची गरज काय? आहे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असताना, शाळा याची जबाबदारी पूर्णपणे घेत असताना, हॉल तिकिटावर उल्लेख करण्याचं कारण काय? असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या जातीच्या मुद्द्यावर समाज व्यवस्था तुटेल की काय? अशी अवस्था असताना असे निर्णय घेताना शिक्षण विभागाने विचार करायला हवा, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
10वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दाहवीच्या परीक्षेची प्रवेशपत्र (Maharashtra SSC Hall Ticket 2025) ऑनलाइन पद्धतीनं जारी करण्याची तारीख जाहीर झाली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 फेब्रुवारीला उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाववरुन (Admit Card) लिंक (Link)व्दारे डाउनलोड (Download) करण्याकरिता उपलब्ध होणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI