Girish Mahajan : रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 448 पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली आहे, त्यासाठी 105.78 कोटी खर्चांची मान्यता देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली.
गिरीश महाजन म्हणाले की, युती शासनाचा मागील 09 वर्षात 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाच्या रुपात कोकणवासीयांना शासनाने दुहेरी आरोग्यदायी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होणार
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर सन 2014 पासून 2023 पर्यंत 09 वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालये राज्याच्या सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे.
मागील 09 वर्षातील 10 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु
रत्नागिरी येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील 09 वर्षातील 10 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा 09 जिल्हामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार
रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास केंद्राचा हिरवा कंदील मिळाला असून या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता 1086 पद निर्मीतीस मान्यता
याच बरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण 1086 पदनिर्मीतीसही मान्यतेचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्यापोटी 109.19 कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे. रत्नागिरी येथील 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु झाल्याने कोकणवासीयांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून दूहेरी भेटच मिळाली आहे.
त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषोपचार आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात बचत होणार आहे. कोकणातील आसपासच्या ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोईसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI