पुणे : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यात पहिली ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी डी.एड. आणि बी.एड पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. 2024 या वर्षातील टीईटी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करणं आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास 9 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे. तर, अर्ज दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे.
महाटीईटी परीक्षेसाठी अर्ज कोण करु शकतं?
महाराष्ट्रातील डी.एड आणि बी.एड पदवी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करु शकतात. महाटीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पहिली ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठीच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास हे विद्यार्थी पात्र ठरतील. शैक्षणिक पात्रतेच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक 1 साठी आणि पेपर क्रमांक 2 साठी अर्ज दाखल करता येतील. दोन्ही पेपरना अर्ज दाखल देखील करता येतात, दोन्ही पेपर द्यायचे की केवळ एक पेपर द्यायचा हे उमेदवारावर अवलंबून असतं.
शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार महाटीईटी परीक्षा इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व परीक्षा मंडळांच्या, सर्व माध्यमं त्यामध्ये अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
परीक्षेचं आयोजन कधी होणार?
महाटीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित केली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेचं प्रवेशपत्र 28 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहेत. तर, परीक्षा 10 नोव्हेंबरला होईल.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 सकाळी 10.30 ते 1.00 वाजेपर्यंत होईल. तर, दुसरा पेपर, त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सुरु होईल. तो साडे चार वाजेपर्यंत असेल.
परीक्षा शुल्क किती?
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेनं महाटीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी शुल्क 700 रुपये निश्चित केलं आहे. तर, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, दोन्ही पेपर साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी शुल्क 900 रुपये निश्चित केलं आहे. तर, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.
इतर बातम्या :
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI