Maharashtra SSC Results 2020 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे.  राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.


 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के

या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.  कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.

 8360 शाळांचा निकाल 100 टक्के

राज्यातील 22570 शाळांमधून 1754367 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली

निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Maharashtra SSC Results | दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी

कोकण विभाग अव्वल

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला आहे.राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 539373 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 550809 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 330588 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 80335 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

SSC Results 2020 Highlights : निकालात मुलींचीच सरशी, जाणून घ्या दहावीच्या निकालासंदर्भात दहा महत्वाचे मुद्दे

मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.मार्च 2020 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2019 च्या निकालाच्या तुलनेत 18.20 टक्के जास्त आहे. खासगीरित्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 42309 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 73.75 आहे.

पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के

MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल

निकाल कुठे आणि कसा पाहाल?

दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता.

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI