MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल
राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर (Maharashtra SSC Results 2020) होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 29 Jul 2020 01:44 PM

पार्श्वभूमी
पुणे : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. आज बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून...More
पुणे : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. आज बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.विद्यार्थ्यांना बोर्डाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल.यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.