Ministry of Higher and Technical Education Postponed CET EXAM : तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी JEE ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यात नीट परीक्षेचं वेळापत्रकही याच परीक्षेच्या काळात होतं. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी CET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
परीक्षेची तारीख बदलली
JEE Main 2022 परीक्षेच्या तारखा बदलल्या
जेईई मुख्य सत्र 1 परीक्षेच्या तारखा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 आहेत. त्याच वेळी, जेईई मुख्य सत्र 2 ची परीक्षा 21 ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. यापूर्वी जेईई मुख्य सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा 21, 24, 25 एप्रिल, 29 एप्रिल आणि 1 मे रोजी ठेवण्यात आल्या होत्या
संबंधित बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI