मुंबई: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Results) मंगळवारी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मंडळाकडून निकालाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढणार आहे. उद्याच्या निकालात काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असते. बारावीच्या टक्केवारीनंतर पुढे कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा किंवा उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची, याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. परिणामी बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे आता उद्या जाहीर होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात काय समोर येणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
बारावीचा निकाल कुठे पाहता येणार?
4. https://results.digilocker.gov.in
5. http://results.targetpublications.org
ऑनलाईन निकाल कसा पाहाल?
* महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे
* निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाचा किंवा अन्य वेबसाईटचा वापर करता येईल.
* वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.
* हा ऑप्शन क्लिक केल्यावर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक अथवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाईल. ही माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
आणखी वाचा
मोठी बातमी, बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट
ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, 400 पैकी 399 गुण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI