Shy People Effect : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व 12 राशींमध्ये प्रत्येक राशीचा (Horoscope) स्वभाव हा वेगळा असतो. प्रत्येक राशीचा आपला स्वत:चा असा एक गुणधर्म असतो. तसेच, प्रत्येक राशीचा स्वभाव ज्याप्रमाणे वेगळा असतो त्याप्रमाणेच त्यांची आवड-निवड वेगळी असते. यामध्ये काही राशी तर अशा आहेत ज्या दुसऱ्यांसमोर आपण मत मांडू शकत नाहीत, किंवा त्यांना मत मांगण्यास लाज वाटते. या राशींची नेमकी खासियत कोणती आहे ते जाणून घेऊयात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क राशीचे लोग स्वभावाने फारच लाजाळू असतात. या राशीचे लोक जेव्हा अनोळखी लोकांना भेटतात तेव्हा ते लगेच मिसळत नाहीत. त्यामुळेच यांना सामाजिक स्तरावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, हे लोक चांगले श्रोते असतात. इतरांचं म्हणणं हे आधी ऐकून घेतात. त्यामुळे, इतर लोक यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. यांचं कमी बोलणं आणि इतरांसमोर आपलं मत न मांडता येणं यामुळे हे लोक संवेदनशील असतात. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. या राशीचे लोक स्वभावाने फार शांत असतात पण बुद्धीने मात्र तल्लख असतात. पण, हे लोक चारचौघांत कम्फर्टेबल फील करत नाहीत. या राशीच्या लोकांना एकांतात राहायला आवडतं. पण,जेव्हा हे लोक बोलतात तेव्हा इतरांना देखील यांचं म्हणणं ऐकायला आवडतं. याचं कारण म्हणजे हे लोक कमी बोलतात म्हणूनच त्यांच्या बोलण्यात वजन असतं. फालतूची बडबड केलेली यांना आवडत नाही. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीचे लोक फार रहस्यमयी स्वभावाचे असतात. या लोकांना चारचौघांत शांतच राहायला आवडतं. तसेत, या लोकांना इतरांबद्दल इनसिक्युर (असुरक्षित) वाटतं.  तसेच, या लोकांना लोक आपल्याबद्दल चुकीचा विचार करतील, आपलं बोलणं त्यांना नीट कळणार नाही किंवा नीट सांगता येणार नाही असे अनेक विचार मनात येतात. यामुळेच हे लोक अनेकदा शांत राहणंच पसंत करतात. पण, जे लोक यांच्या जवळचे आहेत त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यात यांना कोणतीच लाज नसते. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. हे लोक स्वभावाने फार लाजाळू असतात. यांना लोकांमध्ये मिळून-मिसळून बोलायला आवडत नाही. पण ज्यांच्याशी यांची गट्टी जुळली की हे लोक मोकळेपणाने वागतात. अनेकदा यांच्या शांत बसण्याचा लोक चुकीचा अर्थ काढतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Trigrahi Yog 2024 : 19 मे पासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; अनेक वर्षांनंतर वृषभ राशीत जुळून येतोय वृषभ राशीत 'त्रिग्रही योग'