ठाणे : बारावीच्या (12th Boards) आयसीएसई बोर्डाचा (ICSE Board) निकाल जाहीर (Result 2024) झाला आहे. आयसीएसई (Indian Certificate of Secondary Education) बोर्डात बारावीच्या निकालात ठाण्यातील विद्यार्थ्याने भारतात अव्वल स्थान पटकावलं आहे. ठाण्यातील रेहान सिंह बारावी आयसीएसई बोर्डात देशात अव्वल ठरला आहे. 


रेहान सिंह बारावीच्या ICSE बोर्डात भारतात पहिला


ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिह संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. रेहान सिंह याला बारावी आयसीएसई बोर्डात 99.75 टक्के गुण मिळाले आहे. त्याचा 100 टक्के निकाल फक्त एका गुणाने हुकला आहे. रेहानला 400 पैकी 399 गुण मिळाले आहेत.


भारतीय परराष्ट्र सेवेत भरती होण्याची इच्छा


आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान सिंह म्हणाला की, माझे आई-वडील आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळालं आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडतं. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडतं. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेतद्वारे देशाची सेवा करणे, हे माझं स्वप्न आणि ध्येय  आहे.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI