Maharashtra CET Exam : महाराष्ट्र सामाईक परीक्षा विभागाकडून (CET Cell) यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी चार अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय यंत्रणा सुद्धा अद्यावत करण्याच्या दृष्टिकोनातून सीईटी सेल कडून प्रयत्न करण्यात आले आहेत. सीईटी परीक्षेसंबंधी माहिती अलर्ट मिळवण्यासाठी सीईटी सेलकडून अॅप्लीकेशन सुरू केले जाणार आहे. शिवाय,विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्हाट्सअप मेसेज सुद्धा सीईटी सेल कडून या परीक्षेसाठी सुरू केले जाणार आहेत  त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा नोंदणी सोबतच कॅप राऊंड प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा त्रास वाचणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 


सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET) व केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) मधील सुधारणा 


> सामाईक प्रवेश परीक्षा व केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेकरिता मोबाईल प्रणाली (Mobile Application) -


राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षास उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करणे, वेळोवेळी माहिती मिळविणे व इतर आवश्यक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती उमेदवारांना त्वरीत मिळणे या उद्देशाने अँड्रॉइड आणि आयओएस कार्यप्रणालीवर आधारीत मोबाईल प्रणाली (Mobile Application) उपलब्ध करुन देण्यात येत आहे.



2) प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या परीक्षा केंद्रावर नियुक्त करावयाचे मनुष्यबळाच्या संख्येत वाढ


सामाईक प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या परीक्षा केंद्रासाठी एक नोडल लॉग-इन उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक केंद्र प्रमुख, एक सर्व्हर व्यवस्थापक. एक नेटवर्क तज्ञ, 25 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक समवेक्षक, 100 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक सुरक्षारक्षक, 100 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक महिला व एक पुरुष तपासणीस, 100 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक मुख्य पर्यवेक्षक तसेच एक महिला व एक पुरुष सफाईगार परीक्षा कालावधी दरम्यान सेवा पुरवठादारामार्फत परीक्षा केंद्रावर उपलब्ध करण्यात येतील.


परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक पुरुष व एक महिला हवालदार स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत सेवा पुरवठादारामार्फत उपलब्ध करण्यात येईल.


3) उमेदवारांना संदेश देणेसाठी व्हाट्सअँप (व्यावसायिक) मेसेजिंग प्रणालीचा वापर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने उमेदवारांना व विभागांना वेळोवेळी सूचना देणेसाठी एस. एम.एस. व ई-मेल या साधनांसोबतच व्हाटसॲप (व्यावसायिक) प्रणालीचा वापर करण्यात येईल.


4) मदत कक्ष- 


सामाईक प्रवेश परीक्षा (CET) व केंद्रिभुत प्रवेश प्रक्रिया (CAP) यांचे दरम्यान आठवड्याचे सातही दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकूण 10 तारा मदत कक्ष (Help Desk) तर सामाईक प्रवेश परीक्षेआधी किमान तीन दिवसापासून व प्रवेश परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसापर्यंत सदरील मदतकक्ष 24 x 7 उपलब्ध ठेवण्यात येईल.


5) बारकोड / क्यूआर कोड स्कॅन करुन पडताळणी करणे


>  प्रवेश परीक्षेसाठी राज्य सीईटी कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रावर आणि गुणपत्रिकेवर त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी तसेच सत्यता पडताळण्यासाठी बारकोड / क्यू आर कोड अशी सुरक्षा वैशिष्ट्ये असतील.
संबंधित उमेदवारास प्रवेश परीक्षेचे गुणपत्रक उमेदवाराच्या लॉग-इन मधून छापण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.


6) तालुका स्तरावर परीक्षा केंद्र उपलब्ध करणे


राज्य सामाईक प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील तालुक्याच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे प्रवेश परीक्षा केंद्रे उपलब्ध करण्यात येतील.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI