SSC Exam Result 2026 पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. यामुळं दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहायला मिळेल. 

Continues below advertisement

दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?

1. https://sscresult.mahahsscboard.in/2. https://results.digilocker.gov.in     3. https://mahahsscboard.in 4. https://sscresult.mkcl.org 5. https://results.targetpublications.org 6. https://results.navneet.com 

दहावीचा निकाल कसा पाहणार?

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यांना उद्या दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव नोंदवून निकाल पाहता येईल.  

Continues below advertisement

स्टेप 1: mahahsscboard.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यास्टेप 2: Maharashtra SSC Result 2026 ही लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा स्टेप 3: विद्यार्थ्यांनी यानंतर रोल नंबर आणि आईचं नाव नोंदवून लॉगीन करावं. स्टेप 4: विद्यार्थ्यांनी सबमिट बटनावर क्लिक केल्यावर त्यांच्या स्क्रीनवर दहावीचा निकाल उपब्ध होईल स्टेप 5:  दहावीचा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून पुढील कामांसाठी सोबत ठेवा.  

दरम्यान,दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं तात्पुरत्या स्वरुपात गुणपत्रक मिळेल. मूळ गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्याच्या शाळांमध्ये मिळेल. त्यासाठीची तारीख बोर्डाकडून जाहीर केली जाईल.  

निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाची पत्रकार परिषद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे . त्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाची टक्केवारी आणि इतर माहिती दिली जाईल. 

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.निकालासंदर्भात सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात अधिकृत परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता उद्याच्या निकालाकडे लागले आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI