मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल, मे 2021 परीक्षेचे आयोजन करताना इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आली आहे. शिवाय, कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील दोन दिवसात बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.


तसेच इयत्ता दहावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान इयत्ता बारावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.


SSC-HSC | दहावी, बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के होणार?


त्यासोबत विविध समाज माध्यमं, प्रसारमाध्यमात इयत्ता दहावी, बारावी परीक्षे संदर्भात विविध बातम्या, अफवा प्रसारित होत आहेत. त्यामुळे या परीक्षेत संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना आवाहन करण्यात आले आहे, अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. 


दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी 61 टक्के विद्यार्थ्यांची पसंती : विद्यार्थी, पालकांचं सर्वेक्षण


यासंदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे 2021 मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा बाबत मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दोन दिवसात निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करत सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परिक्षांना मुक्त वातावरणात सामोरे जावे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI