मुंबई : चांगली नोकरी सर्वांनाच हवी असते, मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.


स्टेट बँक ऑफ इंडिया



  • पोस्ट – अप्रेंटिस

  • एकूण जागा – 6100 (संपूर्ण देशभरात ही भरती होतेय. य़ात महाराष्ट्रासाठी 375 जागा आहेत.)

  • शैक्षणिक पात्रता- पदवीधर

  • वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष

  • अधिकृत वेबसाईट – sbi.co.in ( या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Join sbi मध्ये current openings वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहीरातीची लिंक दिसेल. Download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021


भारतीय नौदल



  • पोस्ट – नाविक एमआर (Sailor MR)

  • एकूण जागा – 350

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

  • शारीरिक पात्रता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 7 मिनिटांत 1.6 किमी धावणे,  20 स्क्वॉट्स आणि 10 पुश-अप करता येणं आवश्यक आहे.

  • अधिकृत वेबसाईट - joinindiannavy.gov.in 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 (19 जुलैपासून ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येतील.)


 शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला



  • पोस्ट -  एचओडी, लेक्चरर, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, कार्यशाळा अधीक्षक, टर्नर, फिटर, वेल्डर, सुतार, सीएनसी ऑपरेटर, शीट मेटल वर्कर, लॅब असिस्टंट, ग्रंथपाल, स्टोअर कीपर, अकाउंटंट, लिपिक, शिपाई, ड्रायव्हर, गार्डनर, वसतिगृह रेक्टर.

  • एकूण जागा – 69

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला

  • अधिकृत वेबसाईट -  www.spcsangola.com

  • नोकरीचं ठिकाण - सांगोला

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2021


यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 



  • पोस्ट – लिपिक आणि शिपाई

  • एकूण जागा – 42 (यात लिपिक पदासाठी 31 जागा आणि शिपाई पदासाठी 11 जागा आहेत.)

  • शैक्षणिक पात्रता – लिपिक पदासाठी पदवीधर आणि शिपाई पदासाठी 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता हवी.

  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करा.

  • अधिकृत वेबसाईट - ydccbank.org  (या वेबसाईटवर गेल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहीरात दिसेल. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

  • नोकरीचं ठिकाण – यवतमाळ

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2021


संबंधित बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI