JEE Mains Result 2023 : देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन 2023 (JEE-Mains 2023) च्या सत्र 1 परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) NTA जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी एनटीए जेईईच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in  वर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकता आणि डाऊनलोड करू शकता.


JEE मेन जानेवारी सत्र परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 या कालावधीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आली होती. मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, JEE मेन सत्र-1 साठी 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे 2.5 लाख मुली आणि 6 लाख मुलांनी ही परीक्षा दिली होती.


JEE मेन 2023 चा निकाल 'असा' डाऊनलोड करा


स्टेप 1. सर्वात आधी NTA JEE jeemain.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.


स्टेप 2. यानंतर होम पेजवर दिलेल्या 'JEE मेन रिझल्ट 2023' च्या लिंकवर क्लिक करा.


स्टेप 3. आता तुमच्या समोर एक नवीन पेज दिसेल. येथे तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरून घ्या आणि लॉग इन करा.


स्टेप 4. तुमचा जेईई मेन 2023 चा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


स्टेप 5. अशा प्रकारे तुम्ही हा निकाल डाऊनलोड करू शकता. निकाल डाऊनलोड झाल्यावर त्याची प्रिंट आऊट घ्या.


त्याच वेळी, 7 फेब्रुवारीपासून, जेईई मेन्स 2023 (जेईई मेन्स 2023 एप्रिल सत्र) च्या एप्रिल सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू केली जाईल. जेईई मेन 2023 च्या सत्र 2 च्या परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी JEE NTA च्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. जेईई मेन 2023 च्या सत्र 2 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2023 निश्चित करण्यात आली आहे. 


जेईई मेन 2023 परीक्षा 13 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड,मल्याळम, मराठी,ओडिसा, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू) घेण्यात आली. 


JEE Mains 2023 सत्र 2 च्या परीक्षेच्या तारखा


NTA ने JEE Mains च्या एप्रिल सत्राच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत. NTA ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एप्रिल सत्राच्या परीक्षा 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 एप्रिल 2023 रोजी घेतल्या जातील.


महत्त्वाच्या बातम्या : 


SSC Exam: आजपासून मिळणार दहावीचे हॉलतिकीट; औरंगाबाद विभागात 1 लाख 80 हजारांवर विद्यार्थी देणार परीक्षा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI