​JEE Mains 2022 Registration : संयुक्त प्रवेश परीक्षा/JEE (Main) 2022 सत्र 2 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Application Form) सुरू झाली आहे. आता उमेदवार या परीक्षेसाठी 30 जून रोजी रात्री 9 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवाराला परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान जेईई मेन 2022 सत्र 2 ची परीक्षा घेण्यात येणार आहे. 


21 ते 30 जुलै कालावधीत होणार परीक्षा


जेईई मेन 2022 द्वितीय सत्राची परीक्षा 21 ते 30 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे. उमेदवार 30 जून 2022 पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात. ही परीक्षा संगणकावर आधारित पद्धतीने घेतली जाईल.


जेईई मेन 2022 सत्र 2 साठी अर्ज कसा कराल?


1: सर्व अर्जदार सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
2: जेईई (मुख्य) 2022 साठी सत्र 2 (II) नोंदणी' वर जा आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा.
3: आता उमेदवाराची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
4: त्यानंतर उमेदवाराची कागदपत्रे अपलोड करा.
5: त्यानंतर उमेदवाराने फी भरावी आणि फॉर्म सबमिट करावा.
6: आता उमेदवाराने फॉर लो डाउनलोड करावे.
7: शेवटी, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी.


संबंधित बातम्या


JEE 2022 Dates : जेईई मेन 2022 परीक्षा पुढे ढकलली, 'असं' आहे नवं वेळापत्रक


JEE mains 2022 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिलपासून सुरू होणार परीक्षा, असा करा अर्ज


JEE Main Results Declared: जेईई मेन जुलै 2021 चा निकाल जाहीर, कुठे चेक कराल निकाल?


Nagpur : JEE ई मेन्स परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरण; नागपुरातील कोचिंग क्लासेसमध्ये CBI कडून तपासणी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI