मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन जुलै 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स वेबसाईट jeemain.nta.nic.in वर निकालाची लिंक अॅक्टिव्ह झाली आहे. याशिवाय nta.ac.in आणि ntaresults.nic.in वरही निकाल पाहता येईल. NTA ने 5 ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यातील JEE मुख्य परीक्षेची फायनल अन्सर की (Answer Kay) जारी केली होती.
यावर्षी एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती पुढे ढकलण्यात आली. यानंतर, तिसऱ्या टप्प्यातील JEE मुख्य परीक्षा 20 जुलै, 22, 25 आणि 27 जुलै 2021 रोजी घेण्यात आली. त्याच वेळी, पूरग्रस्त भागातील उमेदवारांसाठी परीक्षा 3 आणि 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
सेशन -3 परीक्षेसाठी देशभरातून एकूण 7.09 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. देशभरातील 334 शहरांमधील 828 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली.
तुमचा निकाल कसा तपासता येईल?
- अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
- होमपेजवर Joint Entrance Examination (मेन) 2021 सेशन -3 निकाल लिंकवर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज ओपन होईल. येथे परीक्षा सेशन निवडा आणि आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन भरा आणि सबमिट करा.
- आता तुमचा निकाल (स्कोअर कार्ड) स्क्रीनवर ओपन होईल.
- उमेदवारांनी त्यांच्या स्कोअर कार्डमध्ये दिलेले तपशील तपासा.
- पुढील वापरासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI