JEE Mains 2022 :  नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) जॉइन्ट एंट्रन्स एग्जामिनेशन  (JEE) चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परिक्षेचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेईई मेन्स सत्र हे 16, 17, 18, 19, 20 आणि  21 एप्रिल रोजी होणार आहे. सत्र दोनचे आयोजन  24, 25, 26, 27, 28 आणि 29 मे रोजी होणार आहे.  एनटीएनं हे आधीच सांगितलं आहे की, या वर्षी जेईई मेन्स ही चार ऐवजी दोन वेळा होणार आहे. जेईई मेन्सच्या अधिकृत वेबसाइट  jeemain.nta.nic.in वर विद्यार्थ्यी परीक्षेचे नियम पाहू शकतात. 


जॉइन्ट एंट्रेंस एग्जामिनेशन मेन्समध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर हा पदवीपूर्व अभियांत्रिकी प्रोग्रॅममध्ये (B.E/B. Tech) प्रवेश घेणाऱ्यांसाठी आयोजित केला जातो. या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये विषय आणि परीक्षेची तारीख लिहिलेली आहे.


JEE Main 2022: असा करा अर्ज
1. सर्व प्रथम मोबाईल किंवा लॅपटॉपवर  jeemain.nta.nic.in ही वेबसाइट ओपन करा.
2.JEE Main application form या ऑप्शनवर क्लिक करा.
3. तिथे लिहिलेली माहिती भरा.  
4. अॅप्लिकेशन फॉर्म भरा 
5. ऑनलाइन पद्धतीनं फी भरा. (फी भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे)


6. फॉर्म सबमिट करा. 
7. फॉर्मची प्रिंट काढून ती स्वत:कडे ठेवा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI