JEE Main 2022 Paper 2 Result Released : जेईई मेन 2022 पेपर 2 चा (JEE Main 2022 Paper 2) निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा JEE Mains चा निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. तसेच निकाल डाउनलोडही करता येईल. jeemain.nta.nic.in या लिंकवर JEE मेन पेपर 2 च्या निकालाची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. जेईई मेन रँक कार्ड डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स आणि थेट लिंक खाली दिली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर निकाल पाहू शकतात.


उत्तीर्ण विद्यार्थी JOSAA Counselling 2022 साठी पात्र


जेईई मेन 2022 पेपर 2 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी जोसा काऊंसलिंग 2022 (JOSAA Counselling 2022) साठी पात्र ठरतील. या संदर्भात अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली सूचना पाहू शकतात. जेईई मेन 2022 सत्र 2 परीक्षा 25 जुलै 2022 ते 30 जुलै 2022 या कालावधीत पार पडली. ही परीक्षा देशभरातील नियुक्त केंद्रांवर घेण्यात आली. खाली दिलेल्या स्टेप्सच्या आधारे विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात.


निकाल कसा तपासायचा ते जाणून घ्या


1. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
2. होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.
3. नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती सबमिट करा.
4. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निकाल उपलब्ध होईल.
5. निकाल तपासा.
6. आवश्यक असल्यास तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.


जेईई मेन 2022 सेशन 1 चा निकाल 11 जुलै 2022 रोजी जारी


दरम्यान, 11 जुलै 2022 रोजी जेईई मेन 2022 सत्र 1 चा निकाल जारी करण्यात आला होता. 14 विद्यार्थ्यांना सत्र 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले होते. ही परीक्षा 23 जून 2022 ते 29 जून 2022 दरम्यान भारत आणि परदेशातील 500 हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली. NTA नुसार, दोन्ही सत्र परीक्षांसाठी 1026799 विद्यार्थ्यांनी JEE मेन 2022 साठी नोंदणी केली होती, तर 905590 विद्यार्थी दोन्ही सत्र परीक्षेला बसले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI