मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार असून  आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं मोहित कंबोज यांनी  स्पष्ट केलं. पत्रकार परिषद घेत भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना  संजय राऊतांना मानहानी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे देखील कंबोज म्हणाले. पत्रकार परिषदेत कंबोज यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहे. 


मोहित कंबोज म्हणाले, पत्रकार परिषदेत मोहित कंबोजला मी ओळखत नाही असे संजय राऊत म्हणाले.  परंतु दरवर्षी  गणपतीसाठी संजय राऊत माझ्या घरी आले आहे. एवढच नाही तर राऊतांना गरजेची  अनेकवेळा मी अर्थिक मदत देखील  केली आहे. संजय राऊत यांचा  स्मृतीभ्रंशाचा आजार झाला आहे. त्यामुळे कदाचीत त्यांच्या लक्षात नसेल  राऊतांनी मला फडणवीसांवर माझी  निष्ठा असल्याचे म्हटले आहे.  फडणवीसांवर निष्ठा असणे हे माझे सौभाग्य आहे. परंतु राऊतांनी त्यांची निष्ठा नक्की शरद पवार की उद्धव ठाकरे  यांच्यापैकी कोणासोबत आहे हे स्पष्ट करावे. सध्या संजय राऊतांची अवस्था सध्या घर का ना घाटका अशी झाली  आहे. 


संजय राऊत म्हणाले पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा  आहे. याविषयी बोलताना कंबोज म्हणाले ती जागा माझ्या कंपनीने रितसर खरेदी केली होती. त्यात माझे पैसे बुडाले. त्याची मी रितसर तक्रार दाखल केली आहे आजवर त्या जागेचा पुनर्विकास झालेला नाही. गुरूआशिष कंपनीविरोधात आमच्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल झाला आहे.  कोणतीही माहिती नसताना संजय राऊतांनी खोटेनाटे आरोप करणं बंद करावे.  तसेच  पत्रकार परिषदेपूर्वी अभ्यास करण्याची गरज आहे.   


प्रवीण राऊतनं मनी आणि  पावरचा वापर करत वसईतील जागा मुंबईतील एका प्रतिष्ठीत विकासकाला दिली आहे  हे सारं संजय राऊतांच्या आशीर्वादाने झालं आहे.  त्यात संजय राऊतांना किती मिळाले? याचं त्यांनी उत्तर द्यावं. तसेच  5 हजार कोटींची जागा 1500 कोटींना विकली. संजय राऊत आणि हयातचा काय संबंध? राजकुमार गुप्ता कोण हे देखील  त्यांनी सांगावे.  राजकुमार गुप्ता - वंदना गुप्ता  हे सोन्याची तस्करी करतात. त्यांच्याकडूनं संजय राऊतांनी रोख पैसे घेतले आहेत. दाऊद - हसीना पारकर यांचे मुंबईत कोणशी संबंध आहेत? आज मुंबईत छापेमारी सुरू आहे  त्यावर का नाही बोललात? असा सवाल देखील कंबोज यांनी केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :