NEET PG Exam 2022 Date : भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (IMA) आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा 2022 (NEET PG Exam 2022) स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा 2022 (NEET PG Exam 2022) स्थगित करण्याची मागणी केली आहे. नीट पीजी परीक्षा 21 मे रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून NEET PG 2021 काउंसलिंगच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यानंतर आता आयएमएनेही (IMA) भारतीय वैद्यकीय संघटनेने आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रात म्हटलं आहे की, NEET 2021 परीक्षा पाच महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा ती सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. त्यानंतर OBC आरक्षणाच्या वादामुळे परीक्षेचे समुपदेशन जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आलं.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी परीक्षा स्थगित करण्याची मागणी
भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (IMA) आरोग्य मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राज्यांमधील रिक्त पदांसाठीचे समुपदेशनाची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. IMA ने पत्रात म्हटलं आहे की, कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून पाच ते हदा हजार विद्यार्थांनी इंटर्न म्हणून काम केले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी NEET PG परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन NEET PG परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी IMA ने केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- MPSC Exam : मोठी बातमी! राज्य पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार, 161 पदांसाठी भरती
Indian Army MNS Recruitment 2022 : बीएससी नर्सिंग कोर्ससाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, इथे करा नोंदणी
SAI Recruitment 2022 : येथे नोकरीची शेवटची संधी, 50 पदांवर भरती; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या...
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI