नवी दिल्ली: देशभरात 2557 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचे आयोजन आज 5 डिसेंबरपासून करण्यात येत आहे. त्यासाठी IBPS ने 'IBPS क्लर्क पूर्व परीक्षा सूचना पुस्तक 2020' च्या माध्यमातून कोविड19 मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार उमेदवारांना आपल्या आरोग्याची माहिती आपल्या स्मार्टफोनच्या 'आरोग्य सेतू' अॅपमध्ये नोंद करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना याची माहिती देणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत त्यांना स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार असल्याचंही IBPS ने स्पष्ट केलंय.
परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी ibps.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपले प्रवेश पत्र डाउनलोड करावं असे निर्देश IBPS ने दिले आहेत.
कोणतेही स्टेशनरी साहित्य जसे पेंन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाउच, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेन ड्राइव, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर, मोबाइल फोन, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बॅन्ड, कॅमेरा, कोणतीही धातूची वस्तू, खाण्याचे सामान परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई आहे.
उमेदवारांना उपयुक्त ड्रेस कोड परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांनी अंगठी, कानातले झुमके, गळ्यातले हार, इतर दागिने घालून येऊ नये असेही सांगण्यात आलं आहे. तसेच हेअर पिन, हेअर बॅन्ड, टोपी, कोणत्याही प्रकारचे घड्याळ परीक्षा केंद्रात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डची 2021 ची परीक्षा ऑनलाईन नाही तर लेखी होणार
IBPS ने उमेदवारांसाठी खालील सूचना दिल्या आहेत.
- परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र आणण्यास विसरु नये. परीक्षा सुरु होण्यापूर्वी 15 मिनीटे आधी परीक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
- उमेदवारांनी त्यांच्या सोबत पाण्याची बाटली, हॅन्ड सॅनिटायझर, पेन, पेन्सिल आणि आयडी प्रूफ आणावे.
- आपल्या स्मार्टफोनमधील आरोग्य सेतू अॅपमध्ये आपल्या आरोग्याची स्थिती नमूद करावी. प्रवेशावेळी ही माहिती तपासली जाणार आहे.
- कोरोनाच्या संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
IBPS परीक्षेसंबंधी महत्वपूर्ण माहिती
- ऑनलाइन पूर्व परीक्षा - 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020
- पूर्व परीक्षेचा निकाल - 31 डिसेंबर 2020
- ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर - 12 जानेवारी पासून
- ऑनलाइन मुख्य परीक्षा- 24 जानेवारी 2021
- प्रोव्हिजनल अॅलॉटमेन्ट - 1 अप्रैल 2021
पहा व्हिडिओ: Thane | दृष्टीहीन जयेश कारंडेची 'डोळस' कामगिरी, पहिल्याच प्रयत्नात 'नेट सेट'ची परीक्षा उत्तीर्ण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI