नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा यंदा ऑनलाईन घेण्यात आल्या. मात्र बोर्डाने 2021 मधील परीक्षांबाबत मोठी घोषणा केली आहे.  सीबीएसई बोर्डची 2021 ची परीक्षा ऑनलाईन नाही तर लेखी होणार आहे, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्या वातावरणामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा सीबीएसई बोर्डाचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बोर्डाची परीक्षा पूर्वीसारखीच लेखी घेण्य़ात येणार आहे देईल.





सीबीएसईने परीक्षेच्या पद्धतीविषयी माहिती दिली की, सन 2021 साठीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाइन नसून लेखी स्वरुपाच्या असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या शंकेचं निरसन झालं आहे. वास्तविक यावर्षी कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही यातून सुटलेल्या नाहीत.


सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा इतर परीक्षांप्रमाणेच ऑनलाइन पद्धतीने होणार का? याबाबत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना काळजी होती. मात्र सीबीएसई बोर्डाने आता स्पष्ट केलं आहे की विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच परीक्षेची तयारी करू शकतात, कारण त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.


सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वे पाळली जणार


सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा लेखी स्वरुपात असतील परंतु यावेळी कोविडच्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य पद्धतीने पाळल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही. ऑनलाईन परीक्षांची एक समस्या अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाइन परीक्षा देण्याचे साधन नसते. यामुळे बोर्डही ऑनलाईन परीक्षेचा विचार करत नाही. आतापर्यंत बोर्ड परीक्षांच्या तारखांविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र येत्या 10 डिसेंबर रोजी शिक्षणमंत्र्यांनी आयोजित थेट चर्चासत्रात विद्यार्थ्यांना गोष्टी स्पष्ट होण्याची आशा आहे.