देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. शेतकरी आंदोलकांकडून आता 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक, दिल्लीच्या सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात; आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा



  1. मराठा आरक्षणप्रश्नी 9 डिसेंबरला पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी, अशोक चव्हाण यांची माहिती; अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य सरकारचा अर्ज



  1. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडूनं अर्णब गोस्वामींसह दोघांविरोधात आरोपपत्र दाखल; आज अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी



  1. राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन



  1. चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील 'काश आज ईव्हीएम होता' ; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा टोला



  1. महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का, अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय



  1. ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं ट्वीट



  1. कर्जबुडव्या उद्योगपती विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.8 मिलियन युरोची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई



  1. रेल्वे प्रवाशांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर, रेल्वे प्रवासाची माहिती आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार



  1. कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीमध्ये टीम इंडियाची बाजी; टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव