मुंबई  : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


मध्य रेल्वे


पोस्ट – अप्रेंटिस



  • एकूण जागा –  2 हजार 422 (यात मुंबईत 1 हजार 659, भुसावळ 418, पुणे 152, नागपूर 114, सोलापूरमध्ये 79 जागा आहेत.)

  • शैक्षणिक पात्रता – 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2022

  • वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत

  • अधिकृत वेबसाईट - cr.indianrailways.gov.in 


 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर 



  •  पोस्ट - जीआयएस तज्ज्ञ, उपजीविका तज्ज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यटन गेट व्यवस्थापक

  • एकूण जागा – पाच

  • शैक्षणिक पात्रता- जीआयएस तज्ज्ञ पदासाठी विज्ञान पदवी किंवा बी.ए.आणि तीन वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे. उपजीविका तज्ज्ञ पदासाठी सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी, दोन वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर आणि पाच वर्षांचा अनुभव, पर्यावरण शिक्षण तज्ज्ञ पदासाठी M.Sc वनस्पतीशास्त्र ही पात्रता आवश्यक आहे. तसंच पर्यटन गेट व्यवस्थापक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी भाषेचं ज्ञान, इंग्रजी, मराठी टायपिंग आणि MSCIT ही पात्रता हवी.

  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022

  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - ccffdtadoba2@mahaforest.gov.in 

  •  अधिकृत वेबसाईट -  www.mahaforest.gov.in 


 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया



  • एकूण जागा - 14

  • पहिली पोस्ट - कायदा अधिकारी ग्रेड ‘बी’

  • एकूण जागा - 02

  • शैक्षणिक पात्रता - UGC द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव


 
दुसरी पोस्ट - व्यवस्थापक (तंत्रज्ञ-सिव्हिल)



  • एकूण जागा - 06

  • शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष पात्रता, तीन वर्षांचा अनुभव


 तिसरी पोस्ट - व्यवस्थापक (तंत्रज्ञ-इलेक्ट्रिकल)



  • एकूण जागा - तीन

  • शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी. टेक पदवी, तीन वर्षांचा अनुभवतसंच लायब्ररी प्रोफेशन, आर्किटेक्ट ग्रेड ए, पूर्ण वेळ क्युरेटर पदासाठी प्रत्येकी एक जागा आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2022

  • अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in   (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये recruitment related announcement वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)