Gate 2022 Result Declared : आयआयटी खरगपूरने गेट 2022 च्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. गेट 2022 परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा हजारो विद्यार्थ्यांना होती. विद्यार्थ्यांना gate.iitkgp.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. 


गेट 2022 परीक्षा 5,6,12 आणि 13 फेब्रुवारी रोजी पार पडली होती. विद्यार्थ्यांना 21 मार्चपासून GATE 2022 परीक्षेची गुणपत्रिका डाउनलोड करता येणार आहे. GATE 2022 ची गुणपत्रिका GATE 2022 च्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. GATE 2022 चा निकाल हा निकाल घोषणेनंतर तीन वर्षापर्यंत अधिकृत असणार आहे. 


गेट परीक्षेचे उद्दिष्ट अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांच्या पदवी स्तरावरील विषयांचे ज्ञान आणि आकलन तपासणे हा असतो. दरवर्षी लाखो अभियांत्रिकी पदवीधर विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होतात. सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मोजमाप आणि चाचणी करणे GATE परीक्षेद्वारेच शक्य आहे. त्यामुळे या परीक्षेला मोठं महत्त्व आहे. 


गेट 2022 चा निकाल असा पाहा: 


>>  gate.iitkgp.ac.in येथे GATE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
>>  होमपेजवर, GATE 2022 निकाल लिंकवर क्लिक करा.
>> स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.
>>  तुमचा रोल नंबर आणि आवश्यक माहिती एंटर करा.
>> सबमिट वर क्लिक करा.
>>  तुमचा GATE 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
>>  डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI